मोरोशीत १७ वर्षीय मुलाची आत्महत्या



 मोरोशीत १७ वर्षीय मुलाची आत्महत्या


 राजापूर : मोरोशी काकयेवाडी येथे एका सतरा वर्षीय विवेक विठोबा काकये याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. मयत विवेक याचे आई,वडील हयात नसून तो आपल्या घरी पंधरा वर्षीय छोटी बहीण व दहा वर्षीय भावासह राहत होता. त्याची दोन्ही भावंडे जावडे (ता. लांजा) येथील छात्रालयात होती. मात्र,  कोरोनामुळे गेले काही महिने ही भावंडे मोरोशीला घरी परत आली होती. ही तीन भावंडे एकत्र राहत होती. उदरनिर्वाहासाठी विवेक बारिक-सारिक कामे करीत असे. बुधवारी दुपारी दोन ते साडेतीन या वेळात विवेकने आपल्या दोन्ही भावंडांना दुसऱ्या घरी जा. मला येथे झोपायचे आहे, असे सांगून त्याने दोन्ही भावंडांना दुसऱ्या घरी पाठविले. त्यानंतर विवेकने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.काही वेळाने त्याची बहीण घरी आली असता आत्महत्येचा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान, मृत विवेकचा चुलतभाऊ महेश बाबू काकये याने राजापूर पोलिस ठाण्यात त्याबाबत खबर दिली. याबाबत पोलिस हेडकाँस्टेबल प्रमोद वाघाटे अधिक तपास करीत आहेत. मृत विवेकच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नव्हते.

.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या