चिपळुणात ७ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

 


चिपळुणात ७ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल


 चिपळूण : अनेकवेळा समज देऊनही दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिपळूण पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. सोमवारी दिवसभरात पोलिसांनी ७ व्यापाऱ्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. त्यामध्ये चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सदाकत शरिफ पेचकर (खाटीक आळी), प्रभुस्वामी सिद्धप्पा मठपती (कोलेखाजन), शांताराम दुधाजी घाणेकर(कुंभार्ली), विशाल रमेश जाणवळकर (खेंड), महेंद्रकुमार शोगाजी प्रजापती (भेंडीनाका), श्रीरंग गणपत माजेलकर (पानगल्ली), प्रमोद महादेव खातू (वाणीअळी) या ७ व्यापाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या