मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

 


मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू


 खेड : खोपी गावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चक्रवती नदीत बुडून मृत्यू झाला. जिल्ह्याला अती मुसळधार पावसाचा इशारा असताना तसेच नदीकिनारी कोणीही विनाकारण न जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. असे असतानाही रविवारी १३ रोजी मासे पकडण्यासाठी नदीत गेलेल्या खेडमधील खोपी गावातील ३१ वर्षीय तरुणाचा चक्रवती नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेश वसंत निकम असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments