पत्नीच्या खून प्रकरणी पतीला पोलिस कोठडी



 पत्नीच्या खून प्रकरणी पतीला पोलिस कोठडी


राजापूर : पत्नीचा तोंड व नाक दाबून खून करणारा तालुक्यातील परुळे येथील आरोपी गजानन जगन्नाथ भोवड याला प्रथमवर्ग न्यायालयाने दि. १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान आरोपी गजानन याने गावातील परुळे तट जंगल परिसरात त्याची पत्नी सौ. सिध्दी ऊर्फ विद्या हिचा खून केला होता. शिवीगाळ करणे व त्रास देणे या कारणास्तव आरोपी गजानन याने पत्नी सिध्दीचा खून केल्याची कबुली पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली होती. दरम्यान, आरोपी गजानन याला रविवारी राजापुरातील प्रथमवर्ग न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, त्याला दि. १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या