सिंधुदुर्गातही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; दंगल नियंत्रण पथक दाखल


 


सिंधुदुर्गातही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; दंगल नियंत्रण पथक दाखल


सिंधुदुर्ग: मुंबईत शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आल्यानंतर आता सिंधुदुर्गातही दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तूर्तास हा वाद मिटल्याचे दिसत आहे. शिवसेनेचेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल प्रति वाहन देण्यात येणार होते. भाजप सदस्यत्वांचे ओळखपत्र दाखवणाऱ्याना प्रत्येकी १ लिटर प्रेट्रोल मोफत देण्यात येणार होत कुडाळ मधील भारत पेट्रोल पंप वर पेट्रोल भरण्यावरून भाजप व सेना यांच्यात राडा झाला तत्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करीत यावर नियंत्रण मिळवले. या संघर्षानंतर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा जिल्ह्यात उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या संघर्षानंतर दंगल नियंत्रण पथकही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या