अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशियत पोलिस कोठडीत




 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशियत पोलिस कोठडीत


मंडणगड : तालुक्यातील एका गावातील नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा येथील पोलिस स्थानकात २८ रोजी नोंद झाला असून यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशियत आरोपी आशिष विजय बाईत (१९ राहणार माहू)यास ताब्यात घेतले असून खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात पीडित बालिकेच्या आईने फिर्याद दिली होती. त्यानुसार २७ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी याचे जवळच्या नातेवाईकाने त्यांचे नऊ वर्षांचे मुलीस घरात कोणी नसताना पाठ दाबण्याच्या बहाण्याने बोलावले व घराचा दरवाजा बंद करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तक्रारीनंतर संशयिताविरोधात बाल लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सुशांत वराळे करीत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments