रत्नागिरीत पावसाची जोरदार बॅटिंग
रत्नागिरीत पावसाची जोरदार बॅटिंग
◼️ दरडी, संरक्षक भिंती कोसळल्या; शेतात पाणी शिरून नुकसान
रत्नागिरी : जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शनिवारी दुपारनंतर मुसळधार कोसळल्यानंतर रविवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र सायंकाळपासून पुन्हा कहर केला. चिपळूणात वीज पडून घरांचे नुकसान झाले. गणपतीपुळ्यात शेतात पाणी शिरून नुकसान झाले. उक्षी येथे नवीन बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. वरवडे येथे दरड कोसळून नुकसान झाले आहे. मंडणगड तालुक्यात मौजे दोणारी-वडवली रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद होता. सा.बां. विभागाने दरड हटवून रस्ता सुरळीत केला. दापोली तालुक्यात मौजे दापोली येथे मिलींद तुकाराम खोपटकर यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे घराचे अंशत: 5395 रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी नाही. मौजे दाभोळ येथे विजय बोरघरे यांच्या घराचा बांध ढासळल्याने शेजारील रामचंद्र बोरघरे यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी नाही. चिपळूण तालुक्यात मौजे माउकी येथे संतोष घाणेकर यांच्या घरावर वीज पडून घराचे अंशत: नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे नांदिवसे-राधागनर येथे विनायक शिंदे यांच्या गोठ्याला अचानक आग लागून खाक झाला. कोणतीही जिवीत हानी नाही.राजापूर तालुक्यात मौजे दोनिवडे येथे बाळू भागाजी पवार यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान रु. 1 लाख 15 हजार रुपयांचे. कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मौजे चुनाकोळवण येथे लक्ष्मण तानाजी मटकर यांच्या पडवीचे पावसामुळे अंशत: 45 हजार रुपयांचे नुकसान झाले.कोणतीही जिवीत हानी रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. वरवडे येथील प्रकाश खेडेकर आणि रवींद्र खेडेकर यांच्या घरा मागील दरड कोसळुन घरात पाणी शिरले. गाव गणपतीपुळे, बांध पडून शेतात पाणी घुसून शेतीचे नुकसान झाले आहे. गणपतीपुळे येथे बांध पडून शेतात पाणी घुसून चंद्रकांत विठ्ठल रानडे. नारायण हेरंब बापट, गणपत भिकाजी केदार, अशोक यशवंत चव्हाण, कुमार दामोदर जोशी, विजय राजाराम भिडे यांच्या शेतीचे नुकसान झाले. उक्षी वाघजाई मंदिरा जवळ पुलाशेजारी असलेली नवीनच बांधलेली संरक्षक भित कोसळली. उक्षी येथील सुनील गराटे यांचे घराजवळ असलेली संरक्षक भित कोसळली. वरवडे येथील शंकर दामोदर बोरकर यांच्या घरात पाणी येऊन वस्तूंचे नुकसान झाले आहे. गजानन कृषणाजी वाळीबे नाखरे यांचा शेतीसाठी घातलेला बांध पडला आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment