वाढदिवसाला कु सायली कवडीवले हिनेकेले मिठाई चे वाटप
वाढदिवसाला कु सायली कवडीवले हिनेकेले मिठाई चे वाटप
तालुका (प्रतिनिधी) फिरोज तडवी:-आज यावल येथील शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांची मुलगी कु सायली कवडीवाले हिने आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करीत गरीब नागरिकांना व गरजू लोकांना यावल येथील शासन मान्य व शिवशक्ती बचतगट संचालित शिवभोजन थाळी माध्यमातून प्रत्येक थाळी पार्सल द्वारा मिठाई चे वाटप केले व एक स्तुत्य उपक्रम राबविला. आपल्या वाढदिवसाचा खर्च न करता गरिबांना मिठाई वाटप करून नव्या पिढी समोर आदर्श ठेवला.यावल येथील शिवभोजन केंद्रावर सुरवातीला स्वराज्य फाउंडेशन चे अध्यक्ष श्री भरत चौधरी ,व शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित गरजू गरीब नागरिकांना शिवभोजन थाळी पार्सल चे मिठाई सह वाटप करण्यात आले.यावेळी भरत चौधरी,शिवसेना तालुका उप प्रमुख शरद कोळी,शहर उप प्रमुख संतोष धोबी,तालुका संघटक आर के सर,विभाग प्रमुख योगेश राजपूत यांचे हस्ते वाटप करण्यात आले.या साठी शिवभोजन केंद्र संचालक व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले.या स्तुत्य उपक्रम बद्दल कु सायली हीचे वाढदिवसा निमित्त महेलखेडी येथील शाखा प्रमुख आशिष झुरकाळे यांच्या सह अनेकांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
Comments
Post a Comment