शेवटचा उपाय वीज जोडणी खंडित – महावितरण
शेवटचा उपाय वीज जोडणी खंडित – महावितरण
रत्नागिरी:-रत्नागिरी महावितरण कंपनी वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडली आहे. मागील वर्षापासून आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे घरी येऊन वीज मीटरचे रीडिंग घेणे थांबवण्यात आले होते. त्यामुळे मागील बिलाच्या आधारावर सरासरी बिल काढण्यात आलीत. पण आलेली बिले एवढी जास्त रकमेची होतीत कि, ग्राहकांना ती वेळेत भरणे शक्य झाले नाही.कोरोनामुळे अनेक जणांचे रोजगार गेले, अनेक जणांचे व्यवसाय ठप्प झाले, सर्वच घरी असल्याने घरातील विजेवर त्याचा जास्त ताण पडल्याने वीज मीटर पण चांगलेच फिरले. पण काही ठिकाणी वापरापेक्षा वीजबिल जास्त आल्याने ग्राहकांनी तक्रार केली. तर त्यावर आलेले वीज बिल भरावेच लागेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही एवढ्या वाढीव वीजदरामध्ये काही अंशी सवलत मिळेल असे जाहीर केलेले, त्यामुळे ग्राहक सुद्धा काहीतरी सवलत मिळेल या आशेवर राहिल्याने वीज बिलामध्ये अजून वाढच होत गेली. आणि अचानक मग महावितरणाने बिल वेळेत भरले नाही तर वीज तोडणी करण्याचे जाहीर केले. महावितरणापुढे असलेले वीज बिल वसुलीचे आव्हान लक्षात घेता, शेवटचा उपाय म्हणून जे थकबाकीदार आहेत, त्यांची विजेची जोडणी खंडित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment