ना. उदय सामंत यांच्या आमदार निधीतून तरुणांचे लसीकरण होणार : बंड्या साळवी




ना. उदय सामंत यांच्या आमदार निधीतून तरुणांचे लसीकरण होणार : बंड्या साळवी


 रत्नागिरी : नगरपालिकेच्या विशेष सभेबाबत माहिती देण्यासाठी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषद बोलावली. यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले कि नगराध्यक्ष प्रदीप साळवी म्हणाले की, आज नगरपरिषदेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या विशेष सभेत 18 ते 21 वयोगटातीठ नागरीकांचा लसीकरणाचा विषय होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या आमदार निधीतून 50 लाख रुपये 18 ते 29 वयोगटातील नागरीकांच्या कोविड लसीकरणासाठी दिले आहेत. त्यामुळे लवकरच शहरात 4 केंद्रांवर 18 से 29 वयोगटातील नागरीकांसाठी लसीकरण सुरु होईल. त्याचबरोबर कोकणनगर येथील कब्रस्तानच्या विषयावर चर्चा करण्यात आली. कोकणनगर येथे 3 एकर जागेत कब्रस्तान आहे. दिड एकर जागा कब्रस्तानसाठी वापरली जाते. सध्या कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यामुळे कब्रस्तानची जागा अपुरी पडत आहे. या संदर्भात नगरसेवक सुहेल मुकादम, मुसा काझी आणि अन्य काही मंडळींनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याची भेट घेतली होती. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी आम्ही मृतदेह नगरपरिषदेच्या ताब्यात देऊ. पुढील कार्यवाही नगरपरिषदेने करायची आहे असे सुचवले होते. त्यानुसार कब्रस्तानच्या प्रमुखांकडून पत्र घेऊन सर्व नियम आणि अटीचे पालन करण्याच्या अटीवर मृतदेह ताब्यात देण्याची परवानगी दिली असल्याचे प्रदीप साळवी यांनी सांगितले.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments