संजय राऊत यांची विकृती वेळीच ठेचून काढली पाहिजे – निलेश राणे
संजय राऊत यांची विकृती वेळीच ठेचून काढली पाहिजे – निलेश राणे
पीडित महिलेच्या पाठिशी उभे राहण्याचे राणे यांनी केले आवाहन
रत्नागिरी:-शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात एका पीडित महिलेने तक्रार केलेली आहे. राऊत किती भयानक माणूस आहे. किती विकृत आहे. त्याची विकृती आताच ठेचली पाहिजे. जर राऊतला आताच ठेचली नाही तर त्याला समज होईल की, मी जर काही जरी केलं तरी महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये मला कुणाचा बाप काहीही करू शकणार नाही, ही समज त्या राउतला आहे. म्हणून ही समज आताच ठेचुन काढायची गरज आहे. असा हल्लाबोल भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर केला आहे.राणे पुढे म्हणाले की, अनेक वर्षांपासून ती पीडित महिला मुंबई पोलीस डिपार्टमेंट मध्ये जातेय. मला संरक्षण करा सांगते. राउत हा माणूस छळतोय. मला टॉर्चर करतोय. पाठलाग आणि जिवे मारण्याच्या प्रयत्नामागे राऊत यांचा हात आहे, राऊतच्या विरोधात माझ्याकडे व्हॉइस क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आहेत. एका क्लिप मध्ये तर चक्क राऊत यांनी पीडित महिलेला आई-बहिणीच्या शिव्या देऊन धमकी दिलेली आहे. असा आरोप या पीडित महिलेने केला आहे. एवढे सगळे पुरावे असून सुद्धा त्या पीडित महिलेची साधी तक्रार सुद्धा मुंबई पोलीस डिपार्टमेंटनी घेतलेली नाही. त्याच्यावरती अहवाल देण्यासाठी आज शेवटी कोर्टाला सांगाव लागलं. कोरोनामध्ये सगळे कोर्ट वगैरे बंद होते म्हणून वेळ लागला. आपण सगळ्यानी त्या पीडित महिलेच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन राणे यांनी केले आहे.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment