रत्नागिरी रेल्वे स्टेशनजवळ चायनीज सेंटरमध्ये सापडला देशी विदेशी मद्य साठा
रत्नागिरी रेल्वे स्टेशनजवळ चायनीज सेंटरमध्ये सापडला देशी विदेशी मद्य साठा
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई
रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील रेल्वे स्टेशन फाटयाजवळील रत्नप्रभा होसींग सोसायटी येथे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने छापा टाकून 288960 / – रू.किमतीचा देशी विदेशी मदयाचा मुददेमाल जप्त केला.रत्नप्रभा हौसींग सोसायटी येथे देशी विदेशी मदयाचा साठा केला असल्याची माहीती भरारी पथकाला खब-यामार्फत मिळाली होती. या नुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार , प्र.अधिक्षक व्ही.व्ही.वैदय यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने धाड टाकली यावेळी ओमगौरी चायनीज सेंटर येथून देशी विदेशी मदयाचा साठा जप्त केला तसेच आरोपी लॉकडाउनचा फायदा घेवून त्याचे स्वताचे वाहनातून विक्री करीत होता अशी खबर मिळाली होती. त्यानुसार त्याचे हुंदाई आय 10 वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी विदेशी मदयाचा साठा मिळून आला. असा एकूण 288960 / – रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. ही कारवाई 23/05/2021 रोजी सायंकाळी 07.00 च्या सुमारास करण्यात आली.ही कारवाई भरारीपथकाचे निरीक्षक शरद जाधव दुययम निरीक्षक सुनील सावंत , किरण पाटील, जवान विशाल विचारे, अनिता नागरगोजे यांनी केली. याप्रकरणी अविनाश सीताराम दळवी (वय 44 वर्षे रा.रत्नप्रभा हौसींग सोसायटी बी विंग ता.जि.रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्हयात लॉकडाउन कालावधीत अवैध गावठी दारूची व गोवा बनावट मदयाची विक्री होवू नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे प्र.अधिक्षक व्ही.व्ही.वैदय यांनी सांगितले.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment