रत्नागिरीत 'ऑरेंज' अलर्ट, समुद्र खवळला





  रत्नागिरीत 'ऑरेंज' अलर्ट, समुद्र खवळला


◼️ साडे तीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता



रत्नागिरी : हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केले. आज सकाळपासून समुद्र खवळलेला आहे. दमदार पाऊस तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळते. आज दुपारनंतर साडेतीन मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहेत. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर अमावास्येचं हे पहिले उड्डाण असणार आहे. किनारपट्टी भागात आज साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात अलर्ट जारी केलाय.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments