पाच अल्पवयीन मुलांसोबत मातेनं स्वत:लाही रेल्वेखाली झोकून दिलं




 पाच अल्पवयीन मुलांसोबत मातेनं स्वत:लाही रेल्वेखाली झोकून दिलं


रायपूर : छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेनं अनेकांना हादरा दिलाय. महासमुंद जिल्ह्यातील इमलीभाठा परिसरात एका महिलेनं आपल्या पाच मुलांसोबत स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिलं. या घटनेत या सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत महिला आपल्या मुलींसोबत बुधवारी रात्री उशिरापासून बेपत्ता होत्या. आज (गुरुवारी) सकाळी रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना सहा मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्यांत आईसोबत सर्वात मोठी मुलगी १७ वर्षांची आहे तर सर्वात लहान मुलाचं वय अवघ्या १० वर्षांचं आहे रक्तबंबाळ अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर पडलेले हे मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला. मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये उमा साहू (४५ वर्ष), अन्नपूर्णा (१७ वर्ष), यशोदा (१६ वर्ष), भूमिका (१४ वर्ष), कुमकुम (१२ वर्ष), मुलगा तुलसी (१० वर्ष) यांचा समावेश आहे.गुरुवारी सकाळी रेल्वे ट्रॅक जवळून जाणाऱ्या काही स्थानिकांच्या नजरेस हे मृतदेह पडल्यानंतर ११२ या क्रमांकावरून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिकदृष्ट्या हे आत्महत्येचं प्रकरण दिसतंय. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत बमचा गावाचे रहिवासी आहेत. महिलेचा पती केजउराम साहू याला दारुचं व्यसन होतं. रात्री काही क्षुल्लक कारणावरून पती - पत्नीमध्ये वाद झाला होता. कौटुंबिक वादानंतर महिला आपल्या मुलींसोबत घराबाहेर पडली होती. याबद्दल महिलेच्या पतीकडून पोलिसांना कोणतीही सूचना मिळाली नव्हती. महिलेचा पती आपल्या नातेवाईकांच्या घरी पत्नीचा आणि मुलींचा शोध घेत होता.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments