ऑनर किलिंगचा प्रयत्न; वडीलच उठले लेकीच्या जीवावर
ऑनर किलिंगचा प्रयत्न; वडीलच उठले लेकीच्या जीवावर
यवतमाळ: तालुक्यातील चिकणी (कसबा) येथे मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तिच्या वडिलाने मुलीसह जावयावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सागर काशीनाथ अंभोरे (२६) व शुभांगी (२६) हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे दाखल करण्यात आले.'ऑनर किलिंग'च्या या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.चिकणी (कसबा) येथील सागरचे गावातील शुभांगीवर प्रेम जडले. त्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये सहमतीने आंतरजातीय विवाह केला. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्ष झाली. दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना शुभांगीचे वडील दादाराव माटाळकर यांचा या प्रेमविवाहाला सुरुवातीपासूनच विरोध होता. मुलीने गावातील तरूणासोबतच प्रेमविवाह केल्याने ते कुटुंबासह आर्णी येथे स्थायिक झाले होते.रविवारी सायंकाळी ६.३० वाजता दादाराव माटाळकर याने शुभांगी व सागर यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गावी चिकणी (कसबा) येथे जाऊन चाकुने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सागरचे काका नारायण नानाजी अंभोरे यांनी दादाराव माटाळकर याच्याविरोधात आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी दादारावविरूद्ध भादंवि ३०७, ४५० तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन करीत आहे. या घटनेने गावात ‘सैराट' चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment