Aurangabad Zill Parishad: आरोग्य विभागात ३२९ पदांची होणार भरती
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा Corona Virus वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने मेगा भरती-२०१९ च्या जाहिरातीतील आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्गातील पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३२९ पदे भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया राबविली जाणार आहे. २०१९ ला शासनाच्या वतीने आरोग्य विभागातील विविध पदांची जाहिरात काढण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणूक, कोरोना महामारी आदींमुळे गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली. गेल्या वर्षभरात कोरोनाची दोनदा लाट येऊन गेली. या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता दिसून आल्याने, शासनाने आरोग्य विभागातील रिक्तपदे भरण्यास मान्यता दिली आहे. आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका आदी पाच संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत या भरतीसंदर्भातील माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
Comments
Post a Comment