Aurangabad Rain Updates : औरंगाबादेत पावसाची जोरदार हजेरी
औरंगाबाद : शहरात Aurangabad रविवारी (ता.२७) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने Rain हजेरी लावली. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. अनेक सखल भागात पाणी साचले होते. या पावसाची चिकलठाणा वेध शाळेत २२.२ मिलिमिटर नोंद झाली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरीही आर्द्र नक्षत्रात Adra Nakshatra पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात ठिक-ठिकाणी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. असे असतानाच सायंकाळी जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला. उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राचा काही प्रमाणात पाऊस पडल्यानंतर चांगल्या पावसाच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, अपेक्षा असलेले मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे शेतकरी Farmer चिंतातूर झाला होता. मृग नक्षत्रात पाऊस येईल, या अपेक्षेवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, पेरणी झालेल्या परिसरात पाऊस न पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती.
या पिकांना जीवदान देण्याचे काम आर्द्र नक्षत्राच्या पावसाने केले आहे. वैजापूर तालुक्यातील शिऊर, चोरवाघलगाव, गोळवाडी, लासूर, कन्नडमध्ये चापानेर, औराळा, हातनूर, वाळूज परिसर, औरंगाबाद, करमाड, गाडीवाट, खुलताबाद तालुक्यात अनेक ठिकाणांसह शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
Comments
Post a Comment