मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी आर.पी.आय.आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 जून रोजी आंदोलन




मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी आर.पी.आय.आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 जून रोजी आंदोलन


रत्नागिरी:-सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचे निर्देश राज्य शासनाना दिले आहेत. पदोन्नती मध्ये आरक्षण हा सर्व मागासवर्गीयांचा हक्क आहे. त्यामुळे पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य शासनाने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी 1 जून ते 7 जूनपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्र रामदास आठवले यांनी केली आहे.  महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी  महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाटला आहे. महाविकास आघाडी सरकार हे मागासवर्गीय विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नति मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन कोविड-19 चे नियम पाळून सर्व तहसिल कार्यालयात निवेदन देवून दिनांक 9 जून रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती सुरेश सावंत-अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रत्नागिरी जिल्हा यान्नी दिली आहे. 



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments