पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात
अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा (Corona) आलेख कमी-जास्त होत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील ६३३ ग्रामपंचायतींअंतर्गत येणाऱ्या ८२१ गावांनी कोरोनावर (Corona) मात केली आहे. (ahmednagar 821 villages in the district have overcome corona)
हेही वाचा: कोरोनामुळे अहमदनगर शहरात कडकडीत नि"र्बंद", कापडबाजारात शुकशुकाट
जिल्ह्यात एक हजार ५९६ गावे असून, एक हजार ३१८ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीसह नगर शहरात सध्या २२३५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शाळा, सीसीसी विलगीकरण केलेल्या गावांची संख्या एक हजार ८० आहे. जिल्ह्यातील एक हजार ५९६ गावांमध्ये खासगी, शासकीय रुग्णवाहिका पथक स्थापन केलेले आहे. एक हजार ३१८ ग्रामपंचायतींमध्ये लसीकरणासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
हेही वाचा: बापरे ! अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांवर
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील ६३३ ग्रामपंचायत हद्दीतील ८२१ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. इतर गावेही कोरोनामुक्त होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
Comments
Post a Comment