तब्बल 78 दिवसांनी कोंडगाव बाजारपेठ सुरू.;सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार बाजारपेठ


 तब्बल 78 दिवसांनी कोंडगाव बाजारपेठ सुरू.;सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार बाजारपेठ 


साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर महामार्गांनजीक असणारी कोंडगाव बाजारपेठ कोरोना महामरीच्या वाढत्या संसर्गामुळे 14 एप्रिल पासून बंद होती, तब्बल 78 दिवस बाजारपेठ बंद असल्याने आर्थिक नाडी कोलमडली होती, कोंडगावमधील सम्पूर्ण जनता व व्यापारी, सर्व रिक्षचालक शासनाच्या नियमांचे पालन करीत होती, सततच्या लॉक डाऊनमुळे जनता त्रस्त झाली होती, मात्र कोरोना रुग्णांची संख्या सतत दोलायमान होत असल्याने कोंडगावमध्ये निर्बंध कडक करण्यात आले होते.आता मात्र बाजारपेठ सुरू झाल्याने सर्वानाच हायसे वाटले, चाळीस गवे या बाजारपेठेवर अवलंबून असल्याने लॉक डाऊनमुळे यागावतील जनता देखील लॉक झाली होती, सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने बाजरपेठ सुरू होणे आवश्यक होती, मात्र त्यासाठी सर्वांची कोरोना टेस्ट सुरू करण्यात आली व त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळाला त्याचे फळ चांगले मिळाले असून टेस्ट शंभर टक्के करण्याचा मानस सरपंच बापू शेट्ये यांनी केला आहे कोंडगावचा आढावा घेण्यासाठी आमदार राजन साळवी, सभापती जया माने, जिल्हापरिषदेच्या मुख्याधिकारी इंदुराणी जाखड, कोंडगाव सरपंच बापू शेट्ये, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनुरकर, भाजपचे अमित केतकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय गांधी, पोलीस यंत्रणा, आरोग्य खाते, पोलीस पाटील मारुती शिंदे, व्यापारी बंधू या सर्वांनी कोंडगाव बाजरपेठ सुरू करण्यासाठी व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे मार्गदर्शक तत्व पाळुन प्रयन केले आणि त्याला यश आले आणि तब्बल 78 दिवसांनी यश आले आणि बाजारपेठ सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या