कोरोना काळात नाशिकमधून 69 मुली घरातून पळाल्या, सोशल मीडियावरील मैत्रीतून पाऊल



नाशिकमध्ये ६९ अल्पवयीन मुली घरातून पसार

 नाशिक : नाशिक शहरात कोरोना काळात तब्बल 69 मुली आपलं घर सोडून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 18 वर्षांखालील मुलींचा समावेश आहे. अवघ्या दीड वर्षांच्या काळात नाशिक शहरातील 69 मुलींनी घर सोडत आपला प्रियकर किंवा इतर वेगवेगळ्या भूलथापांना बळी पडत पळ काढला. मागील वर्षाच्या काळात 37 तर या वर्षात 17 मुलींना आपल्या घरी पाठवण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

सोशल मीडियावर मित्रांच्या जाळ्यात

कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्याने राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. मात्र हातात आलेल्या स्मार्ट फोनचा काही जणांनी चांगला उपयोग केला, तर काहींनी वाईट. सतत मोबाईलचा वापर असल्याने व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यासारख्या सोशल माध्यमांमुळे अनेकांची नवीन व्यक्तींसोबत मैत्री झाली. मात्र ती मैत्री इतकी वाढत ही गेली की, काहींनी प्रेमाच्या आणाभाका घेत आपलं घर सोडायलाही मागेपुढे पाहिलं नाही.

संवादाच्या अभावाने कुटुंबीयांपासून दूर

याला कारणीभूत ठरतो तो घरातील कमी झालेला संवाद. कारण सध्याच्या काळात प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. आपला मुलगा, मुलगी, बहीण, बायको किंवा इतर नातेवाईक काय करतात, याकडे त्यांचं लक्ष नसतं. संवाद असला तर आपल्याला सर्वांच्या भावना कळतात आणि हेच कमी पडलं तर मग मुलं, मुली चुकीचा निर्णय घेऊन मोकळे होतात. आपल्याला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे आपल्या घरातील सदस्यांशी नेहमी संवाद ठेवा, प्रश्न सुटतील आणि अशी वेळ मग येणार नाही.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments