तब्बल 31 तासांनी सापडला ‘सप्तलिंगी’त वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह



तब्बल 31 तासांनी सापडला ‘सप्तलिंगी’त वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह


देवरूख:-संगमेश्वर तालुक्यातील तळेकंटे येथे सप्तलिंगी नदीपात्रातून वाहून गेलेल्या तरूणाचा मृतदेह ३१ तासाने मुचरी पुलाजवळ सापडला आहे. या घटनेची नोंद सोमवारी रात्री ९.३० वाजता देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत सुरेश महोदव मांजरेकर वय ४७ वर्षे यांनी खबर दिली आहे. विनायक रामचंद्र गिते (वय ३६ वर्षे) मृत तरूणाचे नाव आहे. विनायक हा रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलगी प्राची गिते व भाचा स्वराज कारकर यांना घरापासून अर्धा किलोमिटर अंतरावर सप्तलिंगी नदीचे पाणी दाखविण्यासाठी घेवून गेला होता. पाणी दाखवून झाल्यानंतर विनायक हा परटाचे कोंड या ठीकाणी पोहण्यासाठी उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. हा प्रकार प्राची व स्वराज यांनी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिला. ग्रामस्थांनी तत्काळ नदीपात्रात झेपावत विनायक याचा शोध सुरू केला. रविवारी सायंकाळी उशीरापर्यंत परचुरी पर्यंत नदीपात्र परिसर पिंजून काढण्यात आला. तरीही विनायक याचा थांगपत्ता न लागल्याने विनायक हा बेपत्ता झाल्याची फीर्याद सुरेश मांजरेकर यांनी रविवारी सायंकाळी देवरूख पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवारी सकाळपासून देवरूख पोलीसांच्या उपस्थितीत पुन्हा ग्रामस्थांनी शोध मोहिम सुरू केली. शोध मोहिम सुरू असताना सायंकाळी ४.३० वाजता गावातीलच मुचरी पुलाजवळ विनायक याचा मृतदेह ग्रामस्थांच्या हाती लागला. वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात विनायक याच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकूल वातावरणात विनायक याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विनायक याच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने गिते कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारू ती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद तडवी करीत आहेत.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments