रत्नागिरीत 3 किलो ब्राऊन शुगर जप्त
रत्नागिरीत 3 किलो ब्राऊन शुगर जप्त
रत्नागिरी : शहरानजीकच्या टीआरपी येथील कोकण रेल्वे पुलानजीक एका तरुणाकडून ३१ हजार ८५० रुपयांचा ३ किलो ३४ ग्रॅम ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल असा एकूण ४१ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल रविवारी जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केली. फैजान निसार हाजू (२६) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात कलम ८ (क),२२ (अ) एन. डी. पी. एस. कायद्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळूंखे करत असून, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलिस हेडकॉ. शांताराम झोरे, सुभाष भागणे, नितीन डोमणे, मिलिंद कदम, प्रशांत बोरकर, अरुण चाळके, बाळू पालकर, संजय जाधव, पोलिस नाईक विजय आंबेकर, अमोल भोसले, सागर साळवी, पोलिस अंमलदार अक्षय कांबळे यांनी केली.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment