राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील प्राथमिक शाळा क्रमांक 2 ची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थ तिव्र नाराज

 




राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील प्राथमिक शाळा क्रमांक 2 ची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थ तिव्र नाराज


रत्नागिरी:-राजापूर तालुक्यामधील धाऊलवल्ली गावातील प्राथमिक शाळा क्रमांक दोनची झालेली दयनिय अवस्था पाहून तेथील नागरिक, शाळेत जाणारी मुले यांच्यामधुन तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.सदर अत्यंत गंभीर विषयी शासनाकडे, स्थानिक ग्रामपंचायत यांच्याकडे वेळोवेळी अर्जही करण्यात आलेले आहेत. संबंधित शाळेमार्फतही संबंधितांना पत्रव्यवहार केलेला असतानाही कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली दिसून येत नाही. त्याना प्रत्यक्ष भेटून विनंत्याही करण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे सदर गंभीर विषयाची दखल घेऊन "धाऊलवल्ली शिवप्रेरणा ग्रामस्थ संघटना मुंबई" यांनी सुध्दा ग्रामपंचायत येथे सरपंच, ग्रामसेवक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती अर्जही केलेला आहे. तरीही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसून येत नाही. सदर बाबतीत विचारणा केली असता "निधी पास झालेला आहे, जरा बॉण्ड पेपर मिळत नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे" असे कित्येक महिने सांगितले जात आहे. नेमके याचे कारण काय हे कळू शकेल का? अशीही विचारणा होत आहे. लोकप्रतिनिधींच्या एवढे तरी लक्षात आले पाहिजे होते की, आता पावसाळा जोरात चालू आहे, शाळेचे छप्पर नादुरुस्त आहे, काही छप्परचा भाग उडाला असतांना येथील परिस्थिती काय असेल, आतील कागदपत्रे, बसण्याची जागा, इतर शाळेच्या महत्वाच्या वस्तूंची काय अवस्था झाली असेल याचे भान जरी ठेवले असते तर अशा शाळेसारख्या वास्तुची ही अवस्था झाली नसती. तरी शासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष केंद्रित करून तेथील विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग यांना न्याय द्यावा. अशी मागणी करण्यात येत आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments