नियमबाह्य दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई
नियमबाह्य दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई
रत्नागिरी : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना सामाजिक अंतर न ठेवता व शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतर देखील दुकाने उघडी ठेवणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे. काल संगमेश्वरातील काही व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आज सकाळी रत्नागिरीतील काही व्यापाऱ्यांना शासनाचे आदेश न पाळल्याने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. अनेक दुकानदार प्रामाणिकपणे शासनाच्या नियमानुसार आपली दुकाने बंद ठेवून असताना मात्र काही दुकानदार शटर बंद ठेऊन छुप्या पद्धतीने आपला व्यापार करताना दिसत आहेत. अशांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील काही व्यापाऱ्यांनी केली आहे.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment