पावस येथील खलाशाचा मृतदेह सापडला
पावस येथील खलाशाचा मृतदेह सापडला
देवगड : तौक्ते चक्रीवादळात नौका वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्या तिसऱ्या खलाशाचा मृतदेह बुधवारी दुपारी १२.३० वा.सुमारास पालये किनाऱ्याजवळ खडकाळ भागात सापडला. दिनेश गजानन जोशी (३९रा.पावस, रत्नागिरी) असे त्या खलाशाचे नाव आहे. तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका देवगड बंदराला बसला. बंदरातील पाच नौका वाहून गेल्या. यापैकी दोन नौका बंदरातच दोन बाजुला अडकल्या. तर पांडुरंग कृपा ही नौका पालये समुद्र किनारी खडकाळ भागात जावून अडकली व फुटली तर इतर दोन नौका बुडाल्या. यातील रुक्मिणी नौकेवरील नंदकुमार नार्वेकर, दिनेश गजानन जोशी व प्रकाश बिरीद हे तीन खलाशी बेपत्ता होते. नंदकुमार नार्वेकर या खलाशाचा मृतदेह सोमवारी रात्री ८ वा.सुमारास पालये किनाऱ्यालगत मिळाला. दिनेश गजानन जोशी याचा मृतदेह बुधवारी दुपारी १२.३० वा.सुमारास पालये किनाऱ्यालगत खडकाळ भागात अडकलेल्या स्थितीत मिळाला. देवगड पोलिस स्थानकात याची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश बिरीद(रा. राजापूर) याचा शोध सुरू आहे. चक्रीवादळात नौका वाहून गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत चार खलाशी बेपत्ता होते. त्यापैकी तीन खलाशांचे मृतदेह मिळाले आहेत. एका खलाशाचा शोध सुरू आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा