स्टेट बँंकेचे खातेदार आहात! इंटरनेट बॅंकिंगबाबत 'एसबीआय'ने केली महत्वाची घोषणा
स्टेट बँंकेचे खातेदार आहात! इंटरनेट बॅंकिंगबाबत 'एसबीआय'ने केली महत्वाची घोषणा
मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून एनईएफटी सेवा (NEFT) अद्यायावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने आज मध्यरात्रीपासून भारतीय स्टेट बँकेची डिजिटल बँकिंग सेवा बंद राहणार आहे. याबाबत एसबीआयने ट्विट करून खातेदारांना माहिती दिली आहे.आज शनिवार २२ मे २०२१ रोजी मध्यरात्री ००. ०१ मिनिटांपासून रविवार २३ मे २०२१ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत एसबीआयची डिजिटल बँकिंग सेवा तांत्रिक कारणास्तव बंद राहील, असे बँकेने म्हटलं आहे. ग्राहकांना गैरसोय टाळण्यासाठी या काळात डिजिटल बँकिंगचा वापर टाळावा, असे आवाहन एसबीआयकडून करण्यात आले आहे.भारतीय स्टेट बँकेने देखभाल दुरुस्तीच्या कारणांसाठी आज मध्यरात्री १२.०१ ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत डिजिटल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बँकेने डिजिटल सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना एका ट्विटमधून माहिती दिली आहे. त्यामुळे इंटरनेट बँकिंग, योनो ऍपची सेवा,योनो लाईटच्या सेवा बंद राहतील. तसेच ग्राहकांना एनईएफटी सेवा सुद्धा वापरता येणार नाही, असे बँकेने म्हटलं आहे. मात्र याच काळात आरटीजीएस (RTGS) सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे.बँकेकडून डिजिटल सेवा सुरळीत सुरु राहावी म्हणून ठराविक काळानंतर त्याची देखभाल दुरुस्ती केली जाते. गेल्या महिन्यात अशाच कामासाठी बँकेने काही वेळ डिजिटल सेवा बंद ठेवली होती.एसबीआयच्या योनो ऍपचे ३.४५ कोटी युजर्स आहेत. या ऍपवर दररोज ९० लाख युजर्स लॉग इन करतात. डिसेंबर २०२० च्या तिमाहीत एसबीआयने १५ लाखांहून अधिक बँक खाती योनो ऍपच्या माध्यमातून उघडली होती. बँकेचे ८.५ कोटी इंटरनेट बँकिंगचे ग्राहक आहेत. तर १.९ कोटी मोबाईल बँकिंगचे ग्राहक आहेत.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment