कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मिरकरवाडा जेट्टीला भेट
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मिरकरवाडा जेट्टीला भेट
रत्नागिरी:-महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी रत्नागिरीतील मिरकरवाडा जेट्टीला भेट दिली. तौक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मिरकरवाडा जेट्टीला भेट देऊन तेथील मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रत्नागिरी जिल्हा मच्छिमार संघाचे बाबामिया मुकादम यांनी नाना पटोले यांना काही समस्या सांगितल्या. यावेळी माजी खासदार हुसैन दलवाई, माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, कॉंग्रेस नेते अविनाश लाड, माणिकराव जगताप, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले, कॉंग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, प्रदेश चिटणीस रमेश कीर, अशोकराव जाधव, राजिवडा मच्छिमार सोसायटीचे सदस्य शब्बीर भाटकर, जय हिंद मच्छिमार सोसायटीचे आयरे, कोकण विभागीय फिशरमन कॉंग्रेसचे मार्तंड नाखवा, कॉंग्रेस जिल्हा जनरल सेक्रेटरी दिपक राऊत, निसार दरवे, निसार बोरकर, करीम नाकवा, शकील दाव्त, अश्विनी आगाशे, सुश्मिता सुर्वे, रुपाली सावंत, कपिल नागवेकर आदी उपस्थित होते.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment