स्वातंत्र्यवीर सावरकर:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
स्वातंत्र्यवीर सावरकर
नाशिक जिल्ह्यात । भगूर गावात ।
वीर नवजात । हे जन्मले ।।
नाव विनायक । राहिले न मूक ।
स्वातंत्र्याची भूक । पेटलेली ।।
त्यागिला संसार । साहित्य आधार ।
झाले न लाचार । कोणा पुढे ।।
कवी पिंड मूळ । स्वातंत्र्याचे खूळ ।
चळवळ गूळ । वाटीयेला ।।
आसक्ती काव्याची । भिंत तुरुंगाची ।
पाने कवितेची । बनविली ।।
भिंत ही सरली । कल्पना स्फुरली ।
काव्य उतरली । ध्येयवेडी ।।
ज्ञान परदेशी । ध्यान ते स्वदेशी ।
बॉम्ब तंत्र देशी । पाठविले ।।
अंदमान बेट । शिक्षा जन्मठेप ।
सागरात झेप । मारियेली ।।
अंगी राष्ट्रभक्ती । वाहिलीस शक्ती ।
भेदहीन व्यक्ती । दुजा नाही ।।
भारत भू नंदन । राष्ट्राचे वंदन ।
झालात चंदन । देशासाठी ।।
ओढ मातृभूमी । त्यागी स्वाभिमानी ।
देश अभिमानी । विनायक ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
जिल्हा:- सोलापूर
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment