रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे: मंत्री उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे: मंत्री उदय सामंत
रत्नागिरी :-वादळीवा-याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज झालेले असून या काळात किनारपट्टी भागात राहणा-या नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. शनिवारी दिनांक १५ मे रोजी झूम अॅप द्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुढील दोन दिवसांकरिता लोकांनी घराबाहेर पडू नये. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. बोटी किना-यावर आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास स्थलांतर करण्याबाबत तहसिल प्रशासन सुचना देतील. खलाशांची कोव्हिड टेस्ट करण्याबाबतच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. केरळमधून वादळ पुढे सरकले आहे. या वादळाची बाधा रत्नागिरी जिल्ह्याला बाहा होऊ नये अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करुयात. वादळी वा-याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी स्वत: जिल्हाधिका-यांशी संपर्क साधून यंत्रणा सज्ज करुन ठेवण्याबाबत सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील कोव्हिड सेंटर, हॉस्पिटल्स या ठिकाणी विज पुरवठा खंडीत झाल्यास बॅक अप ची व्यवस्था करण्यात आली आहे. वादळी वा-याच्या परिस्थितीत झाडे कोसळून, विजेचे खांब कोसळून संपर्क तुटल्यास कटर, जे.सी.बी., ट्रॅक्टर आदिची व्यवस्था करुन सज्ज रहावे अशा सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. राजापूर, दापोली, गुहागर, रत्नागिरी, मंडणगड या तालुक्यातील किनारपट्टी भागातील ग्रामस्थांनी सतर्क रहावे असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment