राजापूरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गानजीक कोंढेतडकडे जाताना बसतात भाजी विक्रेते
राजापूरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गानजीक कोंढेतडकडे जाताना बसतात भाजी विक्रेते
दिवसभर भाजी विक्री होते, लॉकडाऊनचे नियम धाब्यावर
राजापूर नगर परिषद प्रशासन कारवाई का करत नाही
रत्नागिरी:राजापूरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोंढेतडकडे जाताना वळणावर सांगली येथील भाजी विक्रेते बसतात. दिवसभर भाजी विक्री होते. शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन काळात सकाळी ७ ते ११ या वेळेतच भाजी विक्री करण्याची परवानगी आहे. मात्र हा भाजी विक्रेता दिवसभर भाजी विक्री करित आहे. यासंदर्भात कोंढेतड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदरचा भाजी विक्रेता ज्या ठिकाणी बसतो ती हद्द राजापूर नगर परिषदेची आहे. त्यामुळे आम्ही कारवाई करु शकत नाही. तसेच राजापूर नगर परिषदेचे अधिका-यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले हा भाजी विक्रेता भाजी विक्री करण्यास बसतो हेच आम्हाला माहीती नाही. आम्ही पाहतो. आणि तशा सुचना देतो. असे उत्तर दिले.राजापूर शहरात पोलिस सकाळी ११ वाजता बाजारपेठ बंद करण्याच्या सुचना देतात. विनाकारण बाजारात कुणी फिरताना दिसत असेल तर करवाई करतात. मग हा भाजीविक्रेता पोलिसांना का दिसत नाही?, तसेच राजापूर नगर परिषद या भाजी विक्रेत्यावर ठोस कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता राजापूर तहसिल कार्यालयानेच या विषयात लक्ष घालून शासनाचे नियम तोडणा-या या भाजी विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment