चिंता वाढली; नागपूरात म्युकरमायकोसिसचे आणखी चार बळी
चिंता वाढली; नागपूरात म्युकरमायकोसिसचे आणखी चार बळी
नागपूर: कोव्हिड पश्चात म्युकर मायकोसिस या बुरशी जन्य आजाराचा प्रकोप विभागात वाढत चालला आहे. चिंतेची बाब म्हणजे या फंगसचा विळखा पडून दगावणाऱ्यांचा टक्काही वाढत आहे. त्यामुळे कोव्हिड पाठोपाठ आता दारात ही दुसरी महामारी उभी रहाते, की काय अशी धास्ती वैदर्भीयांच्या मनात बसली आहे.जिल्ह्यात शनिवारी म्युकर मायकोसिसचे निदान झालेल्या नव्या ४३रुग्णांची भर पडली. त्यातील ४ जणांचा उपचारादम्यान मृत्यू ओढवला. त्यामुळे महिनाभरात नागपूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता १ हजार ४५ च्या घरात गेली आहे. यातील ८१ मृत्यू हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात शनिवारी मेयो, मेडिकलसह शासकीय रुग्णालयात १८ तर खासगी रुग्णालयात २५ नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यातील सरकारी रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात ३ असे एकूण ४ मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर या आजाराचे मृत्यू रोखण्याचे आव्हान उभे ठाकत आहे.म्युकरमायकोसिसचे संसर्ग वाढल्याने सद्या शासकीय रुग्णालयात २५६ तर खासगी रुग्णालयात ७८२ बाधितांवर उपचार केले जात असल्याची नोंद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने घेतली आहे.
पूर्व विदर्भात ८६ मृत्यू
......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment