उद्या संपेल माझे कार्य:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास




उद्या संपेल माझे कार्य


उद्या संपेल माझे कार्य तुम्हाला दिसणार नाही
उद्या येईल माझा मृत्यू तुम्हाला दिसणार नाही......

आईबाबाच्या खूप लाडपणात बालपण गेले
उद्या येईल माझा संदेश तुमच्यात असणार नाही......

तळहाताच्या फोडापरी जपून मोठे केले मला
उद्या येईल माझी वार्ता मी लाडका वाटणार नाही...... 

जमतील आया जमतील माणसे  गर्दीच गर्दी
जिकडे तिकडे अक्रोश कुणी शांत राहणार नाही......

गरम पाण्याने आंघोळ घालण्या सर्वांचे हात लागती
फुले अर्पण केली तरी मी तुम्हा बोलणार नाही......

शिडीवर टाकून बांधती मला दो-यांनी लपेटून
असे घाई सर्वत्र  शवबंधन मी सोडणार नाही......

अति जवळचे फार रडती पडती खांदे देती
यापुढे माझ्यासाठी कधी कुणी तरसणार नाही......

चीतेवर लाकडे रचून ठेवून अग्नी लावतात
 नियतीचा खेळ समजून कुणी तडफडणार नाही......

माझ्या गेल्या पश्चात या जगी चार दिवसाचा शोक
गेला तो संपला कुणी खाणे पिणे सोडणार नाही......

स्मृतीदिन येताच पाचीपक्वान करून खातात      
पोटभरून तृप्त होती कुणी दुःखी होणार नाही......

जीव जाता सर्व संपले जगा काही नाही उरले
शेवटच्या वेळी मात्र कुणी कुणाचे होणार नाही.....



देविदास हरीदास वंजारे 
ता.किनवट जि.नांदेड
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments