मृतांचा आकडा ४९ वर




 मृतांचा आकडा ४९ वर

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बुडालेल्या ‘पी ३०५’ तराफ्यावरील एकूण ४९ जणांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडले. या तराफ्यावरील २६ जण, तर वरप्रदा या नौकेवरील ११ जण अद्यापही बेपत्ता आहेत.तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्याने बॉम्बे हायनजीकच्या तेल विहिरींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तयार केलेला ‘पी ३०५’ हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावरील २६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह बुधवारी रात्रीपर्यंत मिळाले होते. आणखी २३ कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडले. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ४९ झाला आहे. अद्यापही २६ कर्मचाऱ्यांचा शोध लागू शकलेला नाही. नौदलाची शोधमोहिम सुरू आहे. आयएनएस कोलकाता ही युद्धनौका बुधवारी रात्री उशिरा बचावलेले कर्मचारी आणि मृतदेह घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर आली. आयएनएस बियास ही युद्धनौका आणखी काही मृतदेह घेऊन गुरुवारी मुंबईत परतली. या तराफ्याशिवाय वरप्रदा या नौकेलाही जलसमाधी मिळाली. त्यावरील २ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून, उर्वरित ११ कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत.

नातलगांची गर्दी

‘पी ३०५’ ही तराफा आणि वरप्रदा ही नौका बुडाल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांच्या परराज्यातील नातलगांनी मुंबईत धाव घेण्यास सुरूवात केली. दोन दिवस उलटूनही कर्मचाऱ्यांचा अद्यापही थांगपत्ता न लागल्याने नातलगांनी जे जे रुग्णालयातील शवागृहाबाहेर गुरुवारी गर्दी केली होती.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments