आबा आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली जैतापूर, तुळसंदे भागाची पाहणी

 



आबा आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली जैतापूर, तुळसंदे भागाची पाहणी


गरजूंना आर्थिक मदतही करण्यात आली


रत्नागिरी:-राजापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आबा आडीवरेकर व मित्र परिवार यांच्या वतीने तौक्ते चक्रिवादळाचा फटका बसलेल्या गावांची पाहणी करण्यात येत आहे. बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य आबा आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तालुक्यातील जैतापूर, तुळसुंदे, अणसुरे, होळी या भागाची पाहणी करण्यात आली. यावेळी वादळी वा-याच्या परिस्थीतीत अतोनात नुकसान झाले अशा काही गरजू ग्रामस्थांना आर्थिक मदतही करण्यात आली. यावेळी राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनीफ मुसा काझी, दळे सरपंच महेश करंगुटकर, जितेंद्र खामकर, मोहन पाडावे, समाधान तावडे, उदय धालवलकर, हर्षद मांजरेकर, पिंट्या कोठारकर आदी उपस्थीत होते.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या

news.mangocity.org