सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज:-रत्नागिरीतील मिरजोळे पाटीलवाडी येथे खुलेआम दारूचा गूळ विक्री सुरु

                                    




रत्नागिरीतील मिरजोळे पाटीलवाडी येथे खुलेआम दारूचा गूळ विक्री सुरु


🔴 जीवनावश्यक विक्री साठी प्रशासनाने दिले 4 तास मात्र गूळ विक्री 15 तास

🔴 कोणत्याही गाड्याना किंवा व्यक्तींना पास आणि अँटीजन टेस्ट केल्या शिवाय जिल्ह्यातील प्रवेश नाही मग गूळ वाहतुकीची गाडी रोज जिल्ह्यात येते कशी? यांना आशीर्वाद कोणाचा?

🔴 दारूचा गूळ अत्यावश्यक सेवेत येतो कां? :- सुजाण जनतेचा प्रश्न

🔴 दांडेआडमच्या मुख्य रस्त्याच्या शेजारी एका पत्र्याच्या शेड मधून जिल्ह्यात पोचतो दारूचा गूळ

🔴 दांडेआडमच्या गूळच्या मुळाशी पोलिस जाणार कां?

🔴 संबंधित विभाग, अन्न औषध प्रशासन मिठाला जागणार कि कारवाई करणार?

🔴 जिल्हाधिकारी साहेब अजब तुमचा कारभार जीवनावश्यक वस्तूवर मात आणि अनधिकृत धंदयाला साथ

🔴 जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक आपणहा साठा जप्त करणार कां?


रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे -पाटील वाडी किराणा दुकानातून व  दांडेअडामच्या मुख्य रस्त्याशेजारी एका मोठ्या पत्राच्या शेडमधून दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या गुळाची  खुलेआम स्टोक करून विक्री केली जात आहे. दारूसाठी लागणारा गूळ जिल्ह्यात सप्लाय केला जात असल्याची खात्री लायक बातमी आहे. हा धंदा गेली अनेक वर्ष सुरु असून कोरोनाच्या काळात सर्व व्यापारी वर्गाला मंदी असताना येथिल प्रवीणची चांदी झाल्याची चर्चा आता परिसरात होत आहे. या खुले आम गूळ विक्रीला नेमका आशीर्वाद तरी कुणाचा असा प्रश्न ही परिसरातील सुजाण नागरीक विचारू लागले आहेत.जिल्ह्यातील लोक कोरोनामुळे एकीकडे वैतागले असून जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक वस्तूवर निर्बंध लावले असून किराणा मालाच्या दुकानात मिळणारें जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 ची वेळ मात्र या दारुसाठी लागणाऱ्या गूळ विक्रीसाठी 15 ते 16 तास परवानगी देण्यात आली आहे कां? असा सवाल आता उपस्थित होतोय. जिल्ह्यातील सीमा कोरोना मुळे बंद आहेत. आत्यावशक असेल तरी पास काडून अँटीजन टेस्ट केल्या शिवाय जिल्ह्यात प्रवेश बंदी असताना कोल्हापूर येथून येणारे हे दारूच्या गुळाचे ट्रक आत्यावश्यक सेवेत मोडतात कां? जर मोडत नसतील तर त्यांना कोणत्याही पास नसताना जिल्ह्यातील प्रवेश कसा मिळतो? या बाबात संशय व्यक्त केला जातोय. हॉस्पिटल ला जायचं असेल तर डॉक्टरचे सर्टफिकेट जोडावे लागते मग जिल्ह्यातील येणाऱ्या या ट्रकला कोणते सर्टफिकेट जोडून प्रवेश दिला जातो हे जाहीर करण्याची मागणी केली जातेय.येवढच नव्हे तर हा धंदा कोणी दुसऱ्या व्यक्तीने केल्यास त्याची सेटिंग लावून कोल्हापूर किंवा रत्नागिरी येथे गाड्या पकडल्या जातात मग दांडेआडम येथे येणारे ट्रक कां पकडले जात नाही.या धंड्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे याची चर्चा आत परिसरात नाक्या नाक्यात सुरु आहे.संबंधित प्रशासन, अन्न औषध विभाग, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तिवर कारवाई करणार कि मिठाला जागणार असे ही बोलले जात आहे. हा गूळ विक्रीत तो स्टार झाला असून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी बाहेरील  जिल्ह्यातुन दारू बनविण्यासाठी लागणार गूळाचे मुळ शोधने गरजेचे आहे. या ठिकाणी रेट पडण्या अगोदर  खबरी या गूळ विक्रेत्याला फोन करून सांगणार कि रेट पडणार आहेत. पण असे सांगण्याच्या भरीत पडून आपला वेळ फुकट घालव नका त्या जागेचे व्हिडीओ, फोटो, काही लोकांनी केला असून स्टोक आलेल्या जागी जर कारवाई झाली नाही किंवा त्यात काही संशय येण्यासारखी कारवाई झाल्यास तो व्हिडीओ आणि फोटो जिल्हा पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांच्या मोबाईलवर पाठवला जाणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे हा स्टार गूळ विक्रेता कधी गजाआड येतोय याची उत्सुकता लोकांना लागलीय आहे.

चौकट

      जिल्हायात छोट्या छोट्या दारू धंद्यावर कारवाई करून नको त्या गरिबाला ला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. पण जेथून सुरवात होते तेच बंद केले तर? मग पोलीसानी रक्षक म्हणून जिल्ह्याच्या या गूळ विक्रेत्याचा मुळ काडून कायमचा हा गैर प्रकार बंद करून या स्टार ला लोकासमोर आणावे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments