सायंकाळ:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
सायंकाळ
शांत ते वातावरण
रवी असे शीत होत,
रंगमय सभोवती
बदलतो निसर्गात.
दृश्य अदभुत पहा
पक्षी प्राणी जाती घरा,
वाट शोधती सर्वच
वाहे डोळ्यातून झरा.
सायंकाळ होता दिसे
आपापल्या सर्वजण,
घरी परती प्रवास
करताना भासे मन.
करू या नमन रोज
येऊ देत निरंतरी,
हर्ष गुलाबी जीवनी
म्हणे रे अष्ट प्रहरी.
जातो घेऊन वाईट
दुःख शिकवितो छान,
माणुसकी माणसात
ठेवू चित्त योग्य भान.
सांगे सर्वांना सदैव
येत आहे दिव्य काळ,
नित्य सोनेरी पहाट
हीच खरी सांजवेळ.
अॅड. लक्ष्मण नारायण बेडेकर,
सायन, मुंबई
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा