तोक्ते चक्रीवादळ: महाराष्ट्रात धडकणार नाही, पण सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जाणवेल : डॉ. शुभांगी भुते

 



तोक्ते चक्रीवादळ: महाराष्ट्रात धडकणार नाही, पण सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जाणवेल : डॉ. शुभांगी भुते



मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेलं तोक्ते चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु यात दिलासादायक बाब म्हणजे हे वादळ महाराष्ट्रात धडकणार नाही. परंतु सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भुते यांनी दिली.
डॉ. शुभांगी भुते यांच्या माहितीनुसार, “येत्या 24 तासात तोक्ते चक्रीवादळ कोकणाच्या जवळ येईल. यावेळी ताशी 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यावेळी पाऊसही पडेल. मात्र महाराष्ट्रात कुठेच वादळ धडकणार नाही. जीवितहानी होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. आजप्रमाणेच उद्याही मुंबईत ढगाळ वातावरण असेल, शिवाय पावसाचीही शक्यता आहे. गोवा किंवा कोकणजवळ वादळ असेल तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने वार वाहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे या वादळाचा मुंबई आणि महाराष्ट्रात प्रभाव नसेल.”सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले आहे. हे वादळ गोव्यापासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. 24 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते किनारपट्टीपासून 350-400 किमी दूर असेल. सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला जाणवेल. ताशी 60 ते 70 प्रति वेग असलेल्या वाऱ्यामुळे कोकण आणि गोव्यातील झाडे तसंच कच्च्या घरांची पडझड होईल. 16 तारखेला रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी परिणाम जाणवतील. तोक्ते चक्रीवादळ 18 तारखेला विरावळ/पोरबंदर ते नलिया या गुजरातमधील किनारपट्ट्यांमध्ये धडकेल, अशी माहिती डॉ. भुते यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून मनुष्यबळ आणि साधनसामुग्री तयार ठेवण्याचे आदेश

अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (14 मे) ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली.किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या. तोक्ते चक्रीवादळाचा प्रभवा विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं आणि मनुष्यबळ तसंच साधनसामुग्री तयार ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments