इंधन भडका सुरुच; मुंबईत पेट्रोलची शंभरी केवळ एक पाऊल दूर, जाणून घ्या आजचा दर

 


इंधन भडका सुरुच; मुंबईत पेट्रोलची शंभरी केवळ एक पाऊल दूर, जाणून घ्या आजचा दर


मुंबई : एक दिवस आड पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. सोमवारी इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही इंधनाच्या किमतीत वाढ केली आहे. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल २३ पैसे आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे. दरम्यान, काल सोमवारी इंधन दर स्थिर होते तर रविवारी पेट्रोल १७ पैसे आणि डिझेल २७ पैशांनी महागले होते.तर शनिवारी इंधन दरात कोणताही बदल झाला नाही. त्याआधी शुक्रवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात १९ पैसे वाढ केली होती. तर डिझेल दरात २९ पैशांची वाढ केली होती. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९९.७० रुपयांवर गेला आहे. मुंबईत पेट्रोल शंभरी गाठण्यापासून आता केवळ एक पाऊल दूर आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.४४ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.०६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.४९ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९१.५७ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.३२ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.११ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८७.१६ रुपये प्रती लीटर झाले आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. लॉकडाउनची निर्बंध शिथिल होत असून वाहतूक पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे विकसित देशांमधील इंधन मागणी वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यात कमॉडिटी बाजारात क्रूडच्या दरात तेजी दिसून आली आहे. सोमवारी बाजार बंद होताना क्रूडचा भाव २ टक्क्यांनी वधारला होता. अमेरिकी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव १.५९ डॉलरने वधारून ६८.३४ डॉलर प्रती बॅरल झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.९४ डॉलरने वधारून ६५.८९ डॉलर प्रती बॅरल झाला.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments