प्रेम तुझ्यावर:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
प्रेम तुझ्यावर
नको गं पोरी रुसू की
फुगू अन् फक्त माझ्यावर
लोकांचं सोडून लक्ष तू
दे माझ्या सांगण्यावर
करेन गं प्रिये प्रेम मी
सागरात तुझ्यावर || ध्रु ||
लॉकडाऊन मधेही मला
लागते जावे नोकरीवर
टाइमपास न करता
उपचार करतो रुग्णांवर
समजून घेऊन तू जरा
विश्वास ठेव माझ्यावर
करेन गं प्रिये प्रेम मी
सागरात तुझ्यावर || १ ||
रुग्णांची सेवा हाच धर्म
कायम माझा असणार
रुग्ण सेवा ही देश सेवा
पुण्य त्याचे लाभणार
मन तुझ करून मोकळ
आता तरी काही बोलणार
करेन गं प्रिये प्रेम मी
सागरात तुझ्यावर || २ ||
अस नको समजू गं प्रिये
नाही प्रेम माझं तुझ्यावर
तुझ्याशिवाय प्रिये खरेच
नाही ध्यान लागे कामावर
तुझ्या काळजीने मला
काल नाही झोप रातभर
करेन गं प्रिये प्रेम मी
सागरात तुझ्यावर || ३ ||
करेन गं प्रिये प्रेम मी
सागरात तुझ्यावर || ध्रु ||
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment