मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा
मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा
पुणे : राज्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता यास चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात मंगळवारी मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण असून पुण्यात बुधवारीहीदेखील मुसळधार पाऊस असणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. खरंतर, तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण, रायगड, सिंधुदूर्ग, मुंबई, ठाणे अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.या चक्रीवादळामुळे यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार आहे. हवामान खात्यानुसार, नैऋत्य मौसमी वारे शुक्रवारी अंदमानात दाखल झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाहीतर चार महिन्यांत म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज आहे तर 15 मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे.
राज्यात पाऊस
राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात शनिवारपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाला सुरुवात होईल. मंगळवारी याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह विजा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment