फांद्या तोडताना विजेचा धक्का बसून वृद्धाचा मृत्यू
फांद्या तोडताना विजेचा धक्का बसून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील टिके येथे झाडाच्या फांद्या तोडताना शॉक लागून वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार २७ मे रोजी सकाळी ८.३० वा. सुमारास घडली. या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केशव सोना सांडीम (६२, रा. टिके, कांबळेवाडी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या बाबत पोलीस पाटील अरुण सोनू फुटक (४५,रा. टिके, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानुसार गुरुवारी सकाळी केशव सांडीम हे टिके येथील हरिश्चंद्र पावसकर यांच्या कंपाउंड मधील सागाच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदीच्या जवळून जाणाऱ्या विजेच्या तरेला स्पर्श झाल्याने सांडीम यांना शॉक लागून त्यांचा झाडावरच मृत्यू झाला.
......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment