अकोल्यातही कडक लॉकडाऊनचा आदेश जारी; भाजीपाला मिळणार पण...




अकोल्यातही कडक लॉकडाऊनचा आदेश जारी; भाजीपाला मिळणार पण...


अकोला: राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता जिल्हा पातळीवर कठोर पावले उचलण्यात येत आहेत. राज्यात लॉकडाऊन असला तरी त्यात काही प्रमाणात देण्यात आलेल्या सवलतींचा फायदा उठवत बाजारात गर्दी केली जात असल्याने कडक लॉकडाऊनचा निर्णय अनेक जिल्ह्यांनी घेतला आहे. आज अमरावती जिल्ह्यानंतर अकोला जिल्ह्यातही ९ मे ते १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊनचा आदेश जारी झाला आहे.करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला होता. या भागात अचानक करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला होता. कडक लॉकडाऊन लावल्यानंतर स्थिती नियंत्रणात आली होती. मधल्या काळात रुग्णवाढीचा वेग खाली आला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने व मृत्यूंचे प्रमाणही वाढल्याने कठोर पावले उचलण्याचा निर्णय अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला आहे.जिल्हाधिकारी पापळकर यांनी एक आदेश जारी करत संपूर्ण जिल्ह्यात ९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १५ मे रात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लावला आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे.


आदेशात नेमकं काय म्हटलंय?

- भाजीपाला सकाळी ७ ते ११ यावेळेत मिळणार. भाजीपाला विक्रीस फेरीवाल्यांना मुभा असेल.

- पार्सल सेवा सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार.

- रेस्टॉरंट, हॉटेलला पार्सलची सुविधा सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. 

- शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपातच द्यावी लागणार आहे.

- बँका, पतसंस्था, वैद्यकीय सेवा, मेडिकल, वर्तमानपत्रे सुरू राहणार.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112






Comments