मालकाकडे ५० लाखाची चोरी करून फरार आरोपीस नवजीवन एक्सप्रेस मधून केले जेरबंद
मालकाकडे ५० लाखाची चोरी करून फरार आरोपीस नवजीवन एक्सप्रेस मधून केले जेरबंद \
भुसावळ फिरोज तडवी :-सेलम पोलीस स्टेशन ( तामिलनाडु ) भाग - ५ गुरन.२४८/२०२१ भादवि.क.३९२ मालकाकडे ५० लाखाची जबरी चोरी ( रॉबरी ) करून फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलिसांनी नवजीवन एक्सप्रेस मधून मुद्देमालासह ,जेरबंद केले आहे . मोहनकुमार जगाथागी, देवनयागम स्टे,सेवापेट,सेलम ( तामिळनाडु ) यांचे कडे त्याचे रहाते घरातुन त्यांचे कडेस कामाला असलेले नोकर यांनी जबरी चोरी करुन ५०,०००,००/- ( पन्नास लाख रुपये ) चोरी करुन नेले होते. त्या अनुषंगाने सेलम पोलीस स्टेशन (तामिलनाडु) भाग - ५ गुरन.२४८/२०२१ भादवि.क.३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हयातील दोन आरोपी हे राजस्थान मधील होते . ते आरोपी हे राजस्थान मध्ये गुन्हयातील मुद्देमालासह जाणार असल्याची माहिती सेलमचे पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती . त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सेलम यांनी जळगाव पोलीस अधीक्षकडॉ.प्रविण मुंढे यांना सदर आरोपी बाबत सर्व माहिती कळवली होती. त्यानुसार डॉ.प्रविण मुंढे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सदर आरोपीतांना मुद्देमालासह ताब्यात घेण्या बाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ.अशोक महाजन,शरीफ काझी, युनुस शेख,प्रदीप पाटील, जयंत चौधरी , सुनिल दामोदरे,विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, मुरलीधर बारी यांचे पथकास त्वरीत तपासकामी रवाना केले होते. या पथकाने मलकापुर ते जळगाव या दरम्यान चेनई - अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस ची तपासणी करुन आरोपी १) मंगलराम आसुराम बिस्नोई. वय - १९ रा.खडाली ता.गुडामालाणी,जि.बाडमेर, राजस्थान , यांचे सह एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेवुन त्यांची नवजीवन एक्सप्रेस मध्येच अधिक चौकशी केली असता त्यांचे कडेस सेलम पोलीस स्टेशन ( तामिलनाडु ) भाग - ५ गुरन.२४८/२०२१ भादवि.क.३९२ या गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमालापैकी ३७,९७,७८०/- रुपये मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. डॉ.प्रविण मुंढे यांचे सुचनेनुसार तामिळनाडु पोलीस राज्यातील संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सदर आरोपिंना घेण्यास येत आहेत.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा