पुण्यातही म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू
पुणे:पुणे शहर आणि जिल्ह्यात करोना संसर्गानंतर काळ्या बुरशीच्या आजाराने (म्युकरमायकोसिस) डोके वर काढले असून, आजमितीला जिल्ह्यात ५२८ रुग्णांवर सरकारी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'म्युकरमायकोसिस'मुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण ससून रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. पुणे शहरात एप्रिलपासून 'म्युकरमायकोसिस' चे रुग्ण आढळत आहेत. करोनाच्या उपचारांदरम्यान दिल्या जाणाऱ्या स्टेरॉइडमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. परिणामी काळ्या बुरशीचा आजार होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरातील सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत आतापर्यंत 'म्युकरमायकोसिस'चे ५७४ रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी ५२८ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, २१ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. एकूण मृतांमध्ये नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात आठ, ससून रुग्णालयात सहा, तर जिल्हा रुग्णालयात चार आणि बाणेर कोव्हिड रुग्णालयात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात आतापर्यंत २०५ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते. त्यापैकी १८९ रुग्ण उपचार घेत असून, १० रुग्ण बरे झाले आहेत. त्या पाठोपाठ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ७१, रुबी हॉलमध्ये ३३, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज रुग्णालयात ३६ रुग्ण उपचार घेत आहेत. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात ३५ आणि नोबेल रुग्णालयात ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा