'जगात करोनापेक्षाही घातक आजाराची साथ येऊ शकते'
'जगात करोनापेक्षाही घातक आजाराची साथ येऊ शकते'
वॉशिंग्टन: करोना महासाथीच्या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. करोना आजारापेक्षाही घातक आजार फैलावण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद असलेल्या १९४ देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, करोनाची लस घेतल्यानंतरही आजाराचा धोका संपणार नाही.जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, करोना विषाणू आणि त्याचे नवीन वेरिएंट फैलावत आहेत अशा वेळी कोणतीही खबरदारींबाबत शिथिलता बाळगणे चुकीचे ठरू शकते. संपूर्ण जग अखेरच्या महासाथीच्या आजाराचा मुकाबला करत नाही. करोनाच्या तुलनेत आणखी घातक आणि संसर्गजन्य असलेला आजार फैलावण्याचा धोका असल्याचे त्यांनी म्हटले.टेड्रोस यांनी लशीचा साठा करणाऱ्या देशांनाही त्यांनी यावेळी सुनावले. त्यांनी म्हटले की, लशीच्या वितरणात जगभरात अपमानास्पद असमानता निर्माण झाली आहे. जगातील एकूण ७५ टक्के करोना लस फक्त १० देशांमध्ये देण्यात आली आहे. गरिब देशातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी नवीन लक्ष्य ठरवण्यात आले आहे. लस साठा करून ठेवणाऱ्या देशांनी गरिब देशांना लशी द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.
......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment