जिल्हा आरोग्य अधिकारीनी नोकरी निमित्त परदेशात जाणाऱ्या युवकांना लस उपलब्ध करून द्या

 


जिल्हा आरोग्य अधिकारीनी नोकरी निमित्त परदेशात जाणाऱ्या युवकांना लस उपलब्ध करून द्या


 अन्यथा प्रशासनाने त्या युवकांना नोकरीची व्यवस्था करावी


रत्नागिरी:-कोरोना काळात आपल्या पोट पाण्यासाठी नोकरी निमित्त रत्नागिरी जिह्यातील जे युवक परदेशात असतात ते सुट्टी निमित्ताने गावी आले आसून त्यांना लस मिळत नसल्याने त्यांना आपल्या नोकरींसाठी पुन्हा परदेशात जात येत नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी 18 ते  44 वयोगटातील युवकांना नियोजन करून त्यांची पासपोर्ट बगुन उपलब्ध करून देण्याची मागणी नवनिर्मिती फाउंडेश संघटनेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक युवक आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वा करण्यासाठी नोकरी निमित्ताने परदेशीत काम करत असतात. सुट्टी निमित्ताने ते सध्या आपआपल्या घरी आले आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांची नोकरीं संकटात आलेली आहे. अश्या युवकांच्या त्यांच्या नोकरीचा प्रश्न असल्याने कॅम्पचे नियोजन करून त्यांचे पासपोर्ट किंवा वीज तपासून अश्या युवकांना लस देण्याचे नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.नियोजनाचा अभाव असल्याने मोठी गल्लत लस देण्यामागे होताना दिसत आहे. त्यामुळे गावातील सरपंच यांना विश्वासात घेऊन नियोजन करणे गरजेचे होते. कोरोनामुळे होणाऱ्या युवकांचे नुकसान भरून काढण्यासाठी  त्या युवकांना लवकरात लवकर लस देण्याचे नियोजन करण्यात यावे जेणे करून हे युवक आपल्याला कामावर जाययला त्यांचा मार्ग मोकळा होईल.यामध्ये सिफवर जाणारी 25 ते 44 या गटातील युवकांचा हाच प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे बेरोजगारी वाढत चालली असताना ज्यां नोकरीं आहे त्यांच्या हातातील नोकरीं ही जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे प्रशासनाने लस देण्याचे नियोजन करा अन्यथा या सर्व युवकांचा नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांनी केली आहे. नवनिर्मिती फाउंडेश या संघटने तर्फे या युवकांची यादी बनविण्याच्या काम सुरु असून 9960416683 या व्हाट्सअप नंबर वर परदेशात किंवा शिप वर जाणाऱ्या युवकांनी आपल्याला पुराव्या सहित नाव, पत्ता, मोबाईल नंबर पाठवावे.जेणे करून ही यादी मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे सुपूर्त करून नियोजन करण्याची मागणी करता येईल.


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments