कोरोनामुळे नाणीज गावाची सीमा बंद




  कोरोनामुळे नाणीज गावाची सीमा बंद 


 रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दक्षतेसाठी ग्रामकृती दलाचे अध्यक्ष गौरव संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. गावाच्या सीमेवर येण्या-जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. एका वाडीतून दुसऱ्या वाडीत कारणाशिवाय जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला असून, त्यासाठी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभत आहे.गावामध्ये कामाशिवाय फिरताना कोणीही आढळल्यास त्याची अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवार, दिनांक ३० एप्रिलपासून गावातील सर्व दुकाने दिनांक ६ मेपर्यंत पूर्णवेळ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112







Comments