पुण्यात माणुसकीला काळीमा! भटक्या कुत्र्यावर वार करून फोडले डोळे
पुणे : पुण्यात रानगव्याच्या हत्येनंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भटक्या कुत्र्यावर धारधार शस्त्राने वार करीत त्याचे डोळे फोडण्यात आले आहेत. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी सांगवी इथं उघडकीस आला. याप्रकरणी प्राणी मित्र अक्षय साहेबराव म्हसे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी म्हसे प्राणीमित्र असून ते दररोज भटक्या कुत्र्याना अन्न देतात. गुरुवारी सकाळी त्यांना सांगवी येथील पवारनगरमध्ये कुत्र्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वार केल्याची माहिती मिळाली.माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता कुत्र्यावर धारदार शास्त्राने वार करून त्याचे डोळे फोडण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. म्हसे यांनी तत्काळ कुत्र्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, कुत्र्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टराराकडून सांगण्यात आलं आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी पुण्यात वाट चुकून कोथरूडमध्ये घुसलेल्या रानगव्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. रानगवा शिरला म्हणून काही लोकांनी त्याचे खूप हाल केले यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याची जोरदार चर्चा सर्वत्र झाली होती. पुण्यातील प्राणीप्रेमी व नागरिकांनाही या घटनेची खंत असल्याचं पाहायला मिळत आहे.
......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा