नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तात्काळ मदत: मुख्यमंत्री

 



नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तात्काळ मदत: मुख्यमंत्री


रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग  आणि रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौर्‍यावर असून झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे आजसकाळी रत्नागिरीत पोहचले असून त्यांनी नुकतीच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. वादळानंतर विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असून उद्धव ठाकरे मात्र चार तासांचा दौरा करत असल्याची टीका विरोधकांनी केली होती.'' कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो असल्याचे म्हटले उद्धव ठाकरे यांनी आहे. तसेच पंचनामे पूर्ण करून मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. '' मी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही. हेलिकॉप्टरमधून नाहीतर जमिनीवरुन पाहणी करत आहे. असं म्हणत विरोधकांना टोलाही लगावला आहे. वादळामुळे तात्काळ मदतीचे आदेश आले असून येत्या दोन ते तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील. माझा पॅकेजवर विश्वास नसून जे महत्त्वाचे आहे ते करणार आहोत. तसेच नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तात्काळ मदतीचा निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. तसेच, वादळात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकार नाराज करणार नाही. नुकसानग्रस्तांसाठी जे करता येणं शक्य आहे ते सर्व उपाय केले जातील. अशी ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



टिप्पण्या